पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, पालघर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा आणि वसई या 6 ही विधानसभा मतदार संघात एकूण 2278 इतक्या मतदान केंद्रांवर 5 वाजेपर्यंत 59.31 टक्के इतकं मतदान मतदान झालं. महिला, वृद्ध, दिव्यांग आणि युवा आदी मतदारांनी यावेळी मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. 5 वाजेपर्यंत सर्वात जास्त 66.31 टक्के मतदान हे विक्रमगड मतदारसंघात झालं तर सर्वात कमी 50.64 टक्के मतदान हे नालासोपारा मतदारसंघात झालं. अनेक मतदार केंद्रांवर मतदानासाठी महिलांचा प्रतिसाद उत्फूर्तपणे दिसून आला.
मतदारसंघ टक्केवारी :
1) 128- डहाणू : 65.52 %
2) 129-विक्रमगड : 66.31 %
3) 130-पालघर : 64.00 %
4) 131-बोईसर : 60.4 %
5) 132-नालासोपारा : 50.64 %
6) 133-वसई : 57.4 %