पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं एक मतदान केंद्र तयार करण्यात आलं होत. जव्हार मधल्या कुतूरविहीर या मतदान केंद्रावर ठरलं आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा देखावा साकार करण्यात आला होता. ग्रामीण भागातल्या मतदारांनी मतदान करण्यासाठी पुढे यावं या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात आदिवासी संकृतीत खाण्यात येणारे खाद्यपदार्थ, औषधी, त्यांचे सण उत्सव कशाप्रकारे साजरे केले जातात त्याचे देखावे, त्यांची वापरातली पारंपारिक साहित्य, तारपा नृत्य आणि वारली पेंटिंग आदींनी हे मतदान केंद्र सजवण्यात आलं होत. त्यामुळे ते आकर्षणाचा विषय ठरलं होत.
त्याच बरोबर डहाणू विधानसभा मतदार संघात मल्यान या मतदान केंद्रावर पर्यावरण संवर्धनाचा देखावा साकारण्यात आला होता. त्यात पर्यावरण संवर्धनाविषयी संदेश देणारे दृश्य-संदेश तयार करण्यात आले होते.