बहुजन विकास आघाडीचे गड गेले
पालघर : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात पालघर जिल्ह्यातल्या 6 पैकी 5 विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. बोईसर, विक्रमगड, पालघर, नालासोपारा आणि वसई या 5 विधानसभा मतदार संघात आपलं वर्चस्व निर्माण करण्यात महायुतीला यश आलं आहे. यात भाजपला ३ जागांवर आणि शिवसेनेला २ जागांवर यश मिळालं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदार संघातलं या निवडणुकीत पूर्णपणे बदलेलं आहे. या ठिकाणी भाजप ला चांगल्या प्रकारे आपलं खात उघडता आलं. तर दुसरीकडे इथल्या तीन विधानसभा मतदार संघात कायम वर्चस्व असक असलेल्या हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाला आपला एक हि गड कायम राखता आलेला नाही. जे सर्वांसाठीचं अनपेक्षित होत.
पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र धेड्या गावित यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र किसन दुबळा यांचा 40,337 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांना 1 लाख 12 हजार 894 इतकी मतं मिळाली तर जयेंद्र दुबळा यांना ७२,५५७ इतकी मते मिळाली.
डहाणू विधानसभा मतदारसंघात माक्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार विनोद भिवा निकोले हे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार विनोद सुरेश मेढा यांचा ५१३३ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत निकोले यांना १,०४,७०२ इतकी मते मिळाली तर मेढा यांना ९९,५६९ इतकी मते मिळाली.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रामचंद्र सखाराम भोये यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुनील भूसारा यांचा ४१,४०८ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भोये यांना १,१४,५१४ इतकी मते मिळाली तर भूसारा यांना ७३,१०६ इतकी मते मिळाली आहेत.
बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास सुकुर तरे १,२६,११७ मत मिळवत विजयी झाले आहेत. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचा ४४,४५५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत पाटील यांना ८१,६६२ इतकी मते मिळाली.
नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांचा ३७,०७७ मतांनी पराभव केला. नाईक यांना या निवडणुकीत १,६५,११३ इतकी मते मिळाली तर ठाकूर यांना १,२८,०३६ इतकी मते मिळाली.
वसई विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांचा ३१५३ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत दुबे यांना ७७,५५३ इतकी मते मिळाली तर ठाकूर यांना ७४,४०० मते मिळाली.