पालघर : पच्छिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेन अपघातात एकाच कुटुंबातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या रेल्वे अपघातात अनुप तिवारी हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी गुजरातच्या एका रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. तर या अपघातात मोनू राम आणि सोनू राम या दोन्ही भावांचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाला आहे.
पहा व्हिडिओ :
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान पालघर रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना मुंबई हून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाडी क्रमांक 12955 जयपूर सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या धडकेने हा अपघात झाला. हे तिन्ही जण पालघर मधल्या एका कंपनीत काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.