पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर – तारापूर एमआयडीसी मधल्या शिवाजीनगर जवळ असलेल्या प्लॉट नंबर K-6/3 यू के अरोमेटिक्स ऍण्ड केमिकल कंपनीत रविवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत 3 कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. घटनेच्या दिवशी यू के अरोमेटिक्स ऍण्ड केमिकल या कंपनीला सुट्टी असल्या कारणाने आणि बाजूच्या कंपनीतील कामगारांनी वेळ राहता त्यांच्या कंपनीतून पळ काढल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली आहे.
पहा व्हिडीओ :
या कंपनीत लागलेल्या आगीची भीषणता जास्त असल्याने उंचच उंच आगीचे लोट परत होते. अधून मधून कंपनीत होत असलेल्या ब्लास्ट मुळे ही आग अधिकच वाढली. आणि तिने बाजूच्या इतर दोन कंपन्यांना ही भस्मसात केलं. अग्निशमन दलाच्या 8 बंबाच्या मदतीने अग्नीशमन दलाच्या जवानांना शर्थीच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरा पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याच कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.