पालघर : पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 844 इतके रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 57 इतक्या नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोव्हिड-19 च्या रुग्णाची आतापर्यंतची एकुण संख्या ही 41 हजार 507 वर पोहचली आहे.
त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 27 हजार 083 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 14 हजार 424 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1069 इतक्या रुग्नांचा मृत्यु झाला आहे. सद्यस्थितीत पालघर ग्रामीण भागात 169 इतकी प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.