पालघर : पालघर जिल्ह्यातला डहाणु, तलासरी आणि आसपासचा परिसर आज पुन्हा सकाळपासून ते आतापर्यंत भूकंपाच्या 4 धक्क्यांनी हादरलायं. 4 धक्क्यां पैकी 2 भूकंपाचे धक्के हे 3.4 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते.
आज सकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी या भागात पहिला 3.4 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदु भूगर्भात 5 किमी खोलवर होता. त्यानंतर 1 वाजून 43 मिनिटांनी 2.4 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. ज्याचा केंद्रबिंदु भूगर्भात 5 किमी खोलवर होता. त्यानंतर 3 वाजून 40 मिनिटांनी 2.8 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला. याचा केंद्रबिंदु भूगर्भात 10 किमी खोलवर होता. आणि मग 4 वाजून 17 मिनिटांनी 3.4 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा चौथा भूकंपाचा धक्का बसला.याचा ही केंद्रबिंदु भूगर्भात 5 किमी खोलवर होता.
जवळपास दोन वर्षां पेक्षा ही जास्त काळापासून इथं सुरु भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र अजुन ही सुरूच आहे. इथलं भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र थांबता थांबत नाहीये. मात्र इतका काळ उलटून गेला असताना ही या भूकंपाच्या धक्क्यांच्या मागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.