पालघर – नदीम शेख : पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२० गुरुवारी सकाळी मासेमारी करिता आत समुद्रात गेले असताना बेपत्ता झालेल्या ‘अग्निमाता’ या मासेमारी बोट व त्यातील ४ व्यक्तींना दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर शोधण्यास अखेर सातपाटी पोलिसांना यश मिळाले आहे.
गुरुवारी मासेमारी साठी सातपाटी येथून समुद्रात गेलेल्या अग्निमाता नावाच्या बोट व त्यातील खलाशी हे मासेमारी करून संध्याकाळी पुन्हा सातपाटी गावात परतणे अपेक्षित होते. परंतु समुद्रात बोटीच्या इंजिन बंद पडल्यामुळे त्यांना येतं आलं नाही, तसेच त्यांच्या जवळ वायरलेस यंत्रणा व मोबाईल फोन नसल्याने त्यांना कुठे ही सम्पर्क करता आलं नाही.
त्यामुळे परत न आल्याने त्या बोटीवरील व्यक्तीच्या एका नातेवाईकांनी सातपाटी पोलीस ठाण्यात कळविले. नंतर सातपाटी पोलीसांनी लगेच शोध घ्यायची सुरुवात केली व सातपाटी गावातील प्रत्येक बोटवाल्यांना सदर बाबतीत विचारपूस केल्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी सातपाटी येथून ४ मासेमारी बोटी सदर बोटीचा शोध लावण्यासाठी रवाना केले. तेव्हा आज सकाळी १० वाजता सदर ‘अग्निमाता’ बोट व त्यातील व्यक्ती समुद्रात ०९ नॉटिकल अंतरावर सुखरूप आदळून आले, मग त्यांना व त्यांची बोटीला गेलेल्या बोटीच्या सहाय्याने सातपाटी गावात सुखरूप परत आणण्यात आलं आहे. सदर कारवाई सातपाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.