पालघर / नीता चौरे : पालघर जिल्ह्यातल्या सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराला इथल्या स्थानिकांचा विरोध आहे. आणि तो विरोध आता वाढू लागला आहे. त्या अनुषंगानं आज वाढवण बंदरासंदर्भात स्थानिक मच्छिमार संघटना तसचं वाढवण बंदर विरोधी संघर्ष कमिटी यांच्या प्रतिनिधीं सोबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात वाढवण बंदरामुळे स्थानिकांना सामोरं जावं लागतं असलेल्या समस्यांचा रीतसर आढावा वाढवण बंदर विरोधी समितीच्या नेत्यांकडून घेण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार नेहमीच मच्छिमार बांधवांसोबत आहे. आणि मच्छिमार बांधवांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
या बैठकीत खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, रवींद्र फाटक, पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण , नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्योती राजेश मेहेर, वाढवणं बंदर विरोधी संघर्ष कमिटीचे अध्यक्ष नारायण पाटील, सचिव वैभव वझे, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, वाढवणं ग्रामपंचायत सरपंच विनिता राऊत, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती चे अध्यक्ष लिओ कोल्यासो, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष राजन मेहेर, महिला संघटक पौर्णिमा मेहेर, फिलिप मस्तन, ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, उपाध्यक्ष वैभव भोईर, ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ अध्यक्ष जयकुमार भय, आदिवासी ऐकता परिषदेचे अध्यक्ष काळू राम धोडदे, विजय विंडे, भुवनेश्वर धनू, मोरेश्वर पाटील, मिलिंद राऊत, वैभव भोईर आदी उपस्थित होते.