पालघर : पालघर जिल्ह्यातल्या पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि वसईच्या दरम्यान रेल्वे रुळावर आज सकाळच्या सुमारास तीन जनांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि वसई रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास रेल्वे रुळावर मालगाडीच्या खाली येऊन एकाच कुंटुंबांतल्या तीन जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे.
या रेल्वे अपघातात 10 वर्षीय समीक्षा ही गंभीर जखमी झाली असून तिच्या वर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 31 वर्षीय सोमनाथ पोपट जंगम, 35 वर्षीय प्रेमीला पोपट जंगम आणि 55 वर्षीय नंदा जंगम या एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कुटुंब विरार इथं राहत होत.
या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.