पालघर : पालघर जिल्ह्यातल्या नालासोपाऱ्या मधल्या तुळींज पोलीस ठाण्यात नाईट डयूटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतः डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिकलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8 वाजताच्या जवळपास तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिन मध्ये शासकीय 9 एम.एम पिस्टल ने स्वतः डोक्यात गोडी झाडून आत्महत्या केली आहे. गेल्या 4 वर्षांपासून ते पालघर जिल्ह्यातल्या तुळींज पोलीस ठाण्यात ते पोलीस हवालदार पदावर कार्यरत होते. मात्र 41 वर्षीय हवलदार सखाराम भोये यांनी आत्महत्या का केली याच कारण अद्याप कलू शकलेलं नाहीये.
त्यांच्या मृत्यु बाबत तुळींज पोलीस ठाण्यात कलम 174 नुसार अकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या शवाला शवविछेदानासाठी पाठवलं असून भोये यांच्या अकस्मात मृत्यूचा पुढील तपास तुळींज विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे हे करत आहेत.