पालघर : पालघर स्टेशनजवळच्या शुक्ला कंपाउंड मध्ये असलेल्या ॐ शांति देव अपार्टमेंट मधल्या श्री अष्टविनायक पतपेढ़ीच्या कार्यालयात शनिवारी रात्री सातपाटीच्या रहणा-या साधना चौधरी नावाच्या महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढलुन आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेवुन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता पालघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिला ही श्री अष्टविनायक पतपेढ़ीच्या कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत होती अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत ही महिला आपल्या घरी पोहचली नाही म्हणुन तिच्या घरच्या लोकांनी तिला फोन केले. मात्र काहीही उत्तर मिळाले नाही म्हणून तिच्या घरच्यांनी या पतपेढ़ीच्या कार्यालयाच्या समोरच्या घरात फोन करून महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समोरच्या घरात रहणा-या व्यक्तींनं जेव्हा पतपेढ़ीच्या कार्यालयात जावून पहिलं तर हे सर्व दृश्य त्याला दिसलं. त्याने या घटनेची माहिती त्वरित महिलेच्या घरच्यांना दिली.
या घटनेची माहिती मिळताचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ॐ शांति देव अपार्टमेंटच्या दुसर्या माळयावर असलेल्या या श्री अष्टविनायक पतपेढ़ीत जावून पहिलं तर त्यांना या महिलेच्या डोक्यावर कश्याने तरी वार करण्यात आल्याचं आणि तिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत कार्यालयात जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढलुन आलं. आणि जमिनीवर सर्वत्र रक्त पसरलेलं असल्याचं दिसून आलं.
या प्रकरणी आता पालघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पालघर पोलीस पुढील तपास करत आहेत.