पालघर : पालघर जिल्ह्यात मंगळवारी त्या वेळेस एकच खळबळ उडाली जेव्हा एका पाठोपाठ एक जिल्ह्यातल्या अनेक आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली. रात्री केलेल्या जेवणानंतर रात्रीच्या वेळी अचानक मुलांना पोटात दुखणं, उलट्या, मळमळ होणं, चक्कर येणं यासारखे त्रास जाणवू लागले ज्यानंतर सकाळी आश्रमशाळेतल्या शिक्षकांनी मुलांना तात्काळ जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी मूलांना तपासलं असता या विद्यार्थ्याना जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. अगोदर कासा उपजिल्हा रुग्णालयात सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आश्रम शाळेतले विद्यार्थी उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर हळूहळू एक दोन नव्हे तर तब्बल 20 ठिकाणच्या आश्रमशाळेतले विद्यार्थी नजीकच्या विविध ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होवू लागले ज्यानंतर ही घटना समोर आली.
पहा व्हिडीओ …..
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या 37 आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यासाठी बोईसर जवळील बेटेगाव या ठिकाणी असलेल्या सेन्ट्रल किचन मधून दररोज नाष्टा आणि जेवण दिल जात. त्यापैकी 20 आश्रमशाळांमधल्या जवळपास 432 पेक्षा ही जास्त मुलांना पोटात दुखणं, उलट्या, मळमळ होणं, चक्कर येणं यासारखे लक्षण जाणवू लागले. त्यांनतर त्यांना नजीकच्या रुग्णालयात आणण्यात आलं. त्यापैकी जवळपास 150 विद्यार्थी हे वेगवेगळ्या ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अडमीट करण्यात आले होते. जिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयात असलेल्या सर्वच मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालघर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास म-हाड यांनी दिली आहे.
ही घटना समोर आल्या नंतर आरोग्य विभागाकडून मुलांना देण्यात आलेल्या जेवणाचे नमुने जमा करण्यात येत आहेत. जे टेस्टिंग साठी पाठवण्यात येणार आहेत. मुलाचं म्हणणं आहे कि, रात्री त्यांनी जेवण केलं त्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांना हे त्रास होवू लागले. मात्र विद्यार्थ्यांना नेमकं कोणत्या जेवणातून विषबाधा झाली हे तर तपासानंतरचं स्पष्ट होवू शकेल.