पालघर : प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र आणि गोवा विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं राज्यव्यापी कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती अभियानाचं आयोजन आजपासून करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांच्या हस्ते फित कापून आणि हिरवा झेंडा दाखवल्यानंतर झाली. पालघर जिल्ह्यात मल्टीमीडिया मोबाइल वैनच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या बोईसर, पालघर, विक्रमगड, सफाळे इथल्या बाजारपेठा मध्ये तसचं जिल्ह्यात कोविड -19 च्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या भागांत सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. या मल्टीमीडिया मोबाइल वैनमध्ये एक कलापथक ही आहे. जे आपल्या लोक कलेच्या माध्यमातून आणि लोकांमध्ये कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती अभियानाबाबत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करतील.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.द्यानंद सूर्यवंशी, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की , जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जवळपास 30 हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्स यांनी वैक्सीन घेतलं आहे. हे वैक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी हे वैक्सीन घेतलं त्यांना कोणाला ही कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले नाहीत. याबाबत आरोग्य विभागाचं पथक प्रत्येक तालुक्यात जावून याबाबत जनजागृती करणार आहे. लस घेतली तरी सर्वांनी कोरोना बाबतचे सर्व नियम पाळणे गरजेचं आहे. सर्व नियमांचं पालण केल्यास आपण कोरोनाच्या दुसर्या लाटेपासून सुरक्षित राहू शकतो. कोरोना लसी बद्दल कोणीही आपल्या मनात शंका ठेवू नयेत असं ही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.