पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वानगाव पोलिसांनी गायींची कत्तल करणा-या 6 जणांना अटक करून त्यांच्याकडून 13 जिवंत गायी, कत्तल केलेल्या गायांचे अवशेष आणि आणि गायींची कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य आदी जप्त केलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातल्या तारापुर जवळील चिंचणी खाड़ी नाका इथं काही गायींच्या कत्तली केल्या जाणार असल्याची सुचना काही लोकांकडून वानगाव पोलिसांना मिळाली होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तिथून 13 गायींसह 6 जणांना अटक केली आहे.
सांगण्यात येत आहे की, अटक केलेले हे लोकं रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर फिरणा-या, रस्त्यावर बसणा-या गायींना चोरून आणत असत आणि मग या गायींची कत्तल करून ते मांस विकत असत. याबाबत पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. तपासानंतरचं हे कळू शकेल की, हे लोकं कत्तल करण्यासाठी गायीं कुठून आणत होते.
या प्रकरणी वानगाव पोलीस ठाण्यात या 6 ही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमूळे परिसरात तणाव निर्माण होवू नये म्हणुन पोलीस यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहे.