मुंबई : दरवर्षी मुंबईच्या एल.एस.रहेजा कॉलेज मधले बी.एम.एम आणि बी.ए.एम.एम.सी चे विद्यार्थी वार्षिक आंतर महाविद्यालयीन रीटेक फेस्ट आयोजित करत असतात. दरवर्षी प्रमाने यावर्षी देखील वार्षिक आंतर महाविद्यालयीन रीटेक फेस्ट उत्साहात संपन्न झाला. मात्र यंदा कोविड-19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यंदाच्या कार्यक्रमाची थीम ही ‘वरचुअल ग्रॅन्ड स्टेन्ड’ (Virtual Grandstand) म्हणजेच प्रसिद्ध युटूबर्सवर्ती आधारित होती.
या कार्यक्रमात २८ नोव्हेंबरला सी.एल मीट आयोजित करण्यात आले होते. ज्यात अनेक महाविद्यालयांनी आपली उपस्थिती दर्शवली. यंदाचा रीटेक फक्त मुंबईच्या महाविद्यालयांसाठी नव्हे तर पहिल्यांदा राष्ट्रीय स्थरावर आयोजित करण्यात आला होता. त्यात राष्ट्रीय स्तरावरती लघु चित्रपट (Short Film), छायाचित्रण (Photography) आणि लघू कथालेखन (Short Story Writing) या तीन स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं.
रिटेक फेस्ट २८ ते ३० जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधी दरम्यान संपन्न झाला. कोविड – 19 च्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दरवर्षी प्रमाणे न ठेवता जरी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला असला तरी देखील विद्यार्थांची उत्सुकता मात्र कमी झाली नाही. यावर्षी देखील कार्यक्रमासाठी विद्यार्थांची उत्सुकता दरवर्षी प्रमानेच दिसून आली.
कोरोना महामारीच्या थैमानाला कोणीही विसरू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला कोरोना काळात अनेक समस्या उद्भवल्या. रोजगार नसल्याने अनेकांची अन्नानदशा झाली. अनेक नागरिकांचे जेवणाचे हाल अजूनही होत आहेत. ही सर्व परिस्थिति पाहता एल. एस. रहेजा या महाविद्यालयातील बी.एम.एम च्या विद्यार्थ्यांनी रिटेक या इव्हेंट च्या माध्यमातून गरजूंना अन्नाची मदत मिळावी यासाठी देखील उपक्रम राबविला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विध्यार्थी मित्रांच्या मार्फत असे सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. यावेळी विद्यार्थ्यांकडून एका “खाद्यपदार्थाच्या फ्रिझ” चे आयोजन करण्यात आले होत. त्या फ्रीझच्या आधारे कोणीही आपल्या पोटाची भूक भागवू शकणार होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून माणुसकी अजूनही कुठेतरी शिल्लक आहेहे दिसून आलं.
मुंबईतील वांद्रे आणि माटुंगा परिसरात ही “खाद्यपदार्थ फ्रीझ” विद्यार्थ्यानी सामाजिक अंतर पाळून आणि कोव्हीड-19 चे नियम सर्व पाळून उपलब्ध करून दिली होती. गरजू लोकांपर्यंत अन्न पोहचवण्याचे मोलाचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी केलं. या विद्यार्थ्यांचं कार्य पाहता हे तरुण विद्यार्थी अश्या प्रकारचे उपक्रम राबवून समाजासाठी खऱ्या अर्थाने आदर्श बनले आहेत असेच म्हणावे लागेल.