पालघर : कोरोना विषाणुचा वाढता प्रसार पाहता आणि आठवडी बाजारात लोकांची भरमसाट गर्दी पाहता पालघर जिल्ह्यातल्या पालघर, बोईसर, मनोर, सफाळे इथले आठवडी बाजार 25 फेब्रुवारी बंद करण्याचे आदेश पालघर चे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी दिले होते.
मात्र हे आठवडी बाजार बंद केल्यानं लोकांचे व्यवसाय, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं निदर्शनास आल्यानं जिल्हाधिका-यांनी गुरुवारी पालघर जिल्ह्यातल्या पालघर, बोईसर, मनोर, सफाळे इथले आठवडी बाजार काही अटी-शर्तीवर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी एका आठवड्यानंतर पुन्हा बोईसर, पालघर इथले आठवडी बाजार भरले आहेत.
जरी आठवडी बाजारावरील बंदी उठवण्यात आली असली तरी आठवडी बाजारातले विक्रते आणि ग्राहक यांनी मास्क घालणे, हँडवॉश / सेनिटाझेशन करणे, शारीरिक अंतर राखणे आदी शासनानं वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातल्या अटी आणि शर्तीचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.