पालघर : जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य कुठल्याही कार्यालयात किंवा कामासाठी गेल्यास त्यांची ओळख पटावी आणि त्यांचा मान राखला जावा या उद्देशानं पालघर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना हे बॅज ( बिल्ले ) देण्यात आलं असल्याचं पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितलं आहे.
जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये जि.प.सदस्यांना हे बॅज देण्यात आले आहेत. तर पंचायत समिती सदस्यांना या बॅजचं वाटप करण्याचं काम सुरू आहे. या बॅजवर जि.प.सदस्य गट निहाय आणि पंचायत समिती सदस्य गण निहाय क्रमांक, पदाचा कालावधी आदी माहितीचा उल्लेख करण्यात आला आहे.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भारती कामडी, उपाध्यक्ष निलेश सांबरे, विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले, सदस्य प्रकाश निकम, नरेश आकरे यांना बॅज देण्यात आले आहेत.