पालघर : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजी गटाच्या महिला शिक्षकांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर एक दिवसीय उपोषण केलं. जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी निवेदन स्वीकारुन उपोषणकर्त्या महिला शिक्षकांना आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं.
पालघर जिल्ह्याची निर्मिती होउन साडेसहा वर्ष होत आली आहेत मात्र तरी देखील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात एक देखील प्रमोशन करण्यात आलेलं नाहीये. हे खुप अन्यायकारक आहे. यामुळे गेल्या साडेसहा वर्षात सेवानिवृत शिक्षकांवर खुप अन्याय झाला आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं प्रमोशनची हमी द्यावी, एका ही विषय शिक्षकाला पालघर जिल्ह्यात पदवीधर वेतनश्रेणी मिलु शकत नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे शासननिर्णय आणि महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा प्रमाणे पदवीधर विषय शिक्षक यांना पदवीधर वेतनश्रेणी लागु करावी, लेखी हमीपत्र घेवुन 12 विज्ञान शिक्षकांना पदस्थापना द्यावी, शालेय विजबिल भरण्याची तरतूद जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करावी, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून इयता 9 वी आणि 10 वी च्या वर्गात शिकवणा-या कंत्राटी पदवीधर शिक्षकांना वेतन मिळावं, पात्रता असलेल्या आणि इच्छुक कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना 9 वी आणि 10 वी च्या वर्गासाठी लेखी हमीपत्र घेऊन नियमानुसार पदस्थापना देवून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं, विना अट 12 वर्षे आणि 24 वर्षे अनुक्रमे वरिष्ठ आणि निवड श्रेणी कार्यालयाने निहित वेळेत प्रत्येक वर्षी सादर करून मंजूर करून घ्यावी.याकामी शिक्षक व्र्गास्ब वेठीस धरु नये अशा विविध मागण्यांसाठी आज हे एकदिवसीय उपोषण महिला शिक्षकांकडून करण्यात आलं.