पालघर : शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्यावतीनं महा कृषी ऊर्जा अभियानअंतर्गत नवीन वीज जोडणी धोरण आणि शेतीपंप ग्राहकांना शेतीपंप देण्याचं धोरण आहे. या धोरणा बाबत माहिती देण्यासाठी महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता अग्रवाल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी महाकृषी ऊर्जा अभियान मार्गदर्शन शिबिराचं आयोजन पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या परनाळी ग्रामपंचायतीच्या सभाग्रृहात करण्यात आलं होतं.
या शिबिरात थकबाकी मुक्त शेतकरी महिला आणि बांधवाचा सन्मान पञ देवुन सत्कार करण्यात आला. तर यावेळी काही शेतकरी बांधवानी कृषी योजने अंतर्गत आपली थकबाकीचा भरणा केला. यावेळी बोईसर ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता रुपेश पाटील आणि सहकारी अभियंता यांनी उपस्थितांना महाकृषी उर्जा आभियाना अंतर्गत शेतीपंपाना नवीन वीज जोडणी धोरण आणि शेतीपंप ग्राहकांना शेतीपंप विजबिलाच्या थकबाकी मध्ये 50 टक्क्यांची सुट ( 50 टक्के विज बिलाची थकबाकी माफ ) या योजने बद्दल माहिती देवून मार्गदर्शन केलं.
जिल्ह्यात कृषिपंप वीज जोडणी धोरण राबविण्यात येत असून या धोरणात अनधिकृत वीज जोडण्या अधिकृत करणं, तत्काळ नवीन वीज जोडणी देणं तसचं कृषिपंपाच्या थकबाकीवर 50 टक्क्यांपर्यंत माफी देऊन आलेल्या वसुलीतून जिल्ह्याची वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी काम केलं जाणार आहे.
यावेळी अधीक्षक अभियंता किरण नागावकर, कार्यकारी अभियंता मचिये, जरग, सरपंच अनंत गोरेकर, उपसरपंच स्वप्निल घरत, माजी पंचायत समिती उपसभापती मनोज संखे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.