पालघर : महाराष्ट्र राज्य कृषि क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी आणि प्रत्येक कृषी पंप वीज ग्राहकाला त्यांच्या मागणी प्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने महाराष्ट्र शासनाचे कृषीपंप वीज जोडणी धोरण – 2020 जाहिर केलं आहे. त्यामुळे या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी वीज ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीनं महा कृषी ऊर्जा अभियाना अंतर्गत 1 मार्च ते 14 एप्रिल या कालावधी दरम्यान कृषि उर्जा पर्व हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
या कार्यक्रमा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी महावितरण कंपनीचे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, पालघर ( लघु ) मंडळ कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पातलीवर आज सकाळी 9 वाजता महावितरणकडून पालघर शहरात सायकल आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही सायकल आणि बाईक रॅली पालघर विभागीय कार्यालय ते पाचबत्ती ( हुतात्मा स्तंभ ) पर्यंत काढण्यात आली. यावेळी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थकबाकीवर मिळणारी भरघोस सवलत, वसूल रकमेतून संबंधित गावातील वीज वितरण यंत्रणेवर ३३ टक्के तर जिल्ह्यातल्या वीज यंत्रणेवर खर्च होणारी तितकीच रक्कम यासह योजनेतील विविध तरतुदींबाबत माहिती देणारे फलक घेऊन सर्व सहभागी झाले होते.
शेतीपंप विजबिलाच्या थकबाकीत 50 टक्के सुट
या रॅलीत कार्यकारी अभियंता प्रताप मचिये, युवराज जरग, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश कदम, उपकार्यकारी अभियंता संजय कोल्हे, रोहित संखे, सहाय्यक अभियंता प्रदीप अर्जुने, निलेश कांबळे, वित्त व लेखा विभागाचे व्यवस्थापक अशोक ढाकणे, कल्पेश पाटिल, भूपेश पाटिल, उमेश सर्वदे, वरिष्ठ जनमित्र अशोक घरत, राजेश वाघमारे सह इतर अभियंते, जनमित्र आदी सहभागी झाले होते.
पालघर विभागीय कार्यालया अंतर्गत एकुण १३ हजार ६०४ इतके कृषी पंप ग्राहक असून त्यांच्याकड़े कृषीपंप वीज धोरण – 2020 अंतर्गत 15.94 कोटी इतकी थकबाकी होती. या अभियाना अंतर्गत एकुण 5 हजार 600 कृषी पंप ग्राहकांनी 2 कोटी 77 लाख रक्क्मेचा भरणा केला असून वीज बिल सवलतीचा लाभ घेतला आहे. तसचं या अभियाना अंतर्गत 127 नवीन कृषीपंप ग्राहकांना नवीन जोडणी देण्यात आली आहे.