पालघर : जिल्ह्यातल्या सर्व गुन्हेगारांवर करवाई करणं आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी पालघर चे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या नेतृत्ववाली अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 8 पोलीस निरीक्षक, 13 सहा. पोलीस निरीक्षक, 21 पोलीस उपनिरीक्षक यांनी 383 पोलीस अंमलदारांच्या सक्रीय सहभागातुन जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट राबवलं.
हे अभियान नाकाबंदी, अक्शन टीम / हंटर टीम – करवाई पथक आणि कॉम्बिंग ऑपरेशन या तीन महत्वाच्या टप्प्यांमध्ये पार पाडण्यात आलं. या अभियाना दरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सर्व सामन्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलानं 16 पोलीस ठाण्याच्या ह्दीत 35 महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती. तसचं सकाळच्या वेळी गुन्हेगारांच्या आश्रयस्थान असलेल्या 29 वस्त्यांमध्ये एकाच वेळी कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं.
आठ तासांमध्ये हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात आलं. यात 221 वाहन धारकांवर गुन्हे दाखल करून करवाई करण्यात आली. तर 30 आस्थापनांवर देखील करवाई करण्यात आली. तसचं 121 निगरानी बदमाशांची एकाचवेळी तपासणी करण्यात आली.