पालघर : पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 44 हजार 911 इतके रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतलेत. तर जिल्ह्यात आज 91 नव्या रुग्णाची नोंद झाली. त्यात पालघर ग्रामीण भागातल्या जव्हार तालुक्यातल्या 36, पालघर तालुक्यातल्या 15 अशा एकुण 51 आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 40 रुग्नांचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना बाधित रुग्नांची आतापर्यंतची एकुण संख्या ही 46 हजार 709 इतकी झाली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 30 हजार 801 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 15 हजार 908 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या मृतांची संख्या आता 1 हजार 207 झाली आहे. तर सध्या कोरोना विषाणुनं बाधित 591 रुग्नांवर उपचार सुरु आहेत.
पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, पालघर या ग्रामीण भागांत गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत असून इथं कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढलुन येवू लागले आहेत. सध्या लोकं मोठ्याप्रमाणात इतरत्र लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी जावू लागले असून पालघर मधले जवळपास १८० जण पालघरहुन राजस्थानला एका लग्नकार्यासाठी विमानानं गेले. आणि तिथून परतल्यानंतर त्यापैकी 3 जण हे कोरोना पॉझीटिव्ह आढलुन आले आहेत. त्यांच्या सोबतचे इतर लोकं देखील पॉझीटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता आज आणि उद्या या दोन दिवसांत त्या सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश पालघरचे तहसीलदार सुनिल शिंदे यांनी दिले आहे.