पालघर : पालघर जिल्ह्यातल्या नंडोरे आदिवासी आश्रमशाळेतल्या 27 विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षकाला अशा 28 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक – दोन दिवसांपूर्वी याच आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थ्याना कोरोनाची लागण झाली होती.
या नंडोरे आदिवासी आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरु होते. काही विद्यार्थींनींना लक्षणं आढलुन आल्यानं त्यांच्या कोरोना चाचण्या केल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्या आश्रमशाळेतल्या 193 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 27 विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं. यातल्या काही जणांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतचं कोविड केअर सेंटर तयार करून वैद्यकीय टीम च्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती डहाणु च्या एस.डी.एम आशिमा मित्तल यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्या मधल्या हिरडपाडा इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 37 विद्यार्थ्यांना , 2 शिक्षकांना आणि एका शिपाईला अशा 40 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
सर्व शासकीय आणि अनुदानित निवासी आश्रमशाळा तसचं इतर शासकीय विभागांची वसतीगृहे आणि खासगी वसतीगृहे ही 22 मार्च ते पुढील आदेश येईपर्यंत बंद :
जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पालघर आणि जव्हार तालुक्यातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याना कोरोनाची लागण होत असल्याची बाब विचारात घेता जिल्ह्यातल्या सर्व शासकीय आणि अनुदानित निवासी आश्रमशाळा तसचं इतर शासकीय विभागांची वसतीगृहे आणि खासगी वसतीगृहे ही 22 मार्च ते पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालघर चे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आज दिले आहेत. यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र वसती गृहात राहणं एच्छिक असणार आहे.
जिल्ह्यात आज 89 नव्या रुग्नांची नोंद :
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 45 हजार 031 इतके रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतलेत. तर जिल्ह्यात आज 89 नव्या रुग्णाची नोंद झाली. त्यात पालघर ग्रामीण भागातल्या जव्हार तालुक्यातल्या 1 , पालघर तालुक्यातल्या 24 अशा एकुण 25 आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 64 रुग्नांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना बाधित रुग्नांची आतापर्यंतची एकुण संख्या ही 46 हजार 967 इतकी झाली आहे. त्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या 30 हजार 959 इतक्या तर पालघर ग्रामीण भागातल्या 16 हजार 008 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या मृतांची संख्या 1 हजार 207 इतकी झाली आहे. तर सध्या कोरोना विषाणुनं बाधित 729 रुग्नांवर उपचार सुरु आहेत.