पालघर : अँटी करप्शन ब्यूरोच्या पालघर यूनिटनं विरारच्या महिला राज्यकर अधिकारी (STO) मीना गिरीश सांड्ये ला 5,000 रुपयांची लाच स्वीकरताना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकील यांचे आशिलांचे वार्षिक निर्धारण आदेश ( असेसमेंट ) करून देण्यासाठी महिला आरोपी लोकसेवक मीना गिरीश सांड्ये यांनी तक्रारदार यांच्याकड़े 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार पालघरच्या अँटी करप्शन ब्यूरोकड़े केली.
त्यानुसार एसीबीच्या टीमनं सापळा रचून तक्रारदारास मागितलेल्या लाचेची रक्कम घेवुन महिला आरोपी लोकसेवक यांच्या कार्यालयात पाठवलं. आणि त्यानंतर आरोपी महिला राज्यकर अधिकारी (STO) मीना सांड्ये यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अँटी करप्शन ब्यूरोच्या टीमनं रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
एसीबी ठाणे परिक्षेत्रचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, एसीबी ठाणे परिक्षेत्रचे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पालघर एसीबीचे नवनाथ जगताप यांच्या पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोह/कदम, मपोह/मांजरेकर, पोना/चव्हाण, पोना/सुवारे , पोना/ सुमडा, चापोशि/ दोडे या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या टीमनं ही यशस्वी करवाई केली आहे.