पालघर : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत असल्यानं संसर्ग पसरत असल्याची बाब विचारात घेता आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना नियम, २०२० चा नियम १० नुसार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जिल्हयातल्या सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट आणि सार्वजनिक सभागृह आदी सर्व ठिकाणी धुलीवंदन कार्यक्रम साजरा करण्यास मनाई आदेश लागु केला आहे.
या मनाई आदेशाचं उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१(b), भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ आणि साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाई केली जाईल.