पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता, लसीकरण जनजागृती आणि त्याचबरोबर तपासणी मोहिमेअंतर्गत आरोग्य चित्ररथ संकल्पना जिल्हाभर राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं गुरुवारी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड पंचायत समिती इथून आरोग्य चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आलायं. तसचं इथल्या कृषी विभागामार्फत भात बी-बियाण्यांचं वाटप करण्यास देखील सुरुवात करण्यात आली आहे.
विक्रमगड तालुक्याकडून कर्जत 250 – १२५ क्विंटल, कर्जत 7 – १०० क्विंटल, सुवर्णा – ५० क्विंटल अशी एकूण 275 क्विंटल ची मागणी करण्यात आली असून त्यापैकी कर्जत 3 – ८० क्विंटल भात बी-बियाणे तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आलेत. आणि याच बी- बियाण्यांच्या वाटपाला यावेळी सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा कृषी समिती सदस्य संदेश ढोणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना सांगितलं कि, मागील वर्षी एका कंपनीच्या भात बी बियाण्यांमध्ये बोगस आणि निकृष्ट दर्जाचे बी बियाणे आढळुन आले होते. मात्र बॅग वरील टॅग आणि पावती नसल्यानं विमा कंपन्यांकडून, पुरवठा करणाऱ्या कंपनी कडून भरपाई घेता आली नाही. त्यामुळे शेतकर-यांनी आता बॅग वरील टॅग आणि पावती जपून ठेवा जेणेकरून असा काही प्रकार घडल्यास शेतकर-यांना भरपाई घेता येऊ शकेल. तसचं बोगस आणि निकृष्ट बी बियाणांची तक्रार वेळीच संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं.
यावेळी विक्रमगड पं. स गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ, पं. स सभापती रुचिता कोरडा, पं.स सदस्य विनोद भोइर, अंजली भोये, मनोज बोरसे, कांता सुतार, सुनीता घाटाळ, सुभाष भोये, पालघर जि.प सदस्य तथा जिल्हा आरोग्य व कृषी समिती सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी कुलकर्णी तसचं आरोग्य व कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.