पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे ओएनजीसी बार्ज हे 18 मे ला पालघर जिल्ह्यातल्या वडराई समुद्रातल्या एका खडकाला अडकलं होतं. आणि त्या बार्जला खालून अनेक छिद्र पडल्यामुळे आता त्या बार्ज मधून डिझेलची गळती सुरु झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाला आणि समुद्रातल्या माश्यांना धोका निर्माण झाला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे अलीबाग कड़े जाणारं ओएनजीसी बार्ज शीपसी संपर्क तुटल्यामुळे भरकटलं आणि ते 18 मे ला पालघर जिल्ह्यातल्या वडराई समुद्रात अंदाजे किना-यापासून 5 किमी अंतरावर एका खडकाला अडकलं. त्यावर तेव्हा 138 कामगार अडकले होते. त्या 138 कामगारांचं इंडियन नेव्ही, कोसगार्ड आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं रेस्क्यू करण्यात आलं होतं. मात्र गेल्या 12 दिवसांपासून हे बार्ज इथंचं अडकून पडलं असून आता त्यातून डिझेलची गळती सुरु झाल्यानं ते डिझेल सुमद्रातल्या पाण्यात पसरु लागलं आहे. त्यामुळे आता पाण्यात डिझेल तवंगच्या तवंग दिसून येवू लागलेत. आणि भयंकर वास सुद्धा येवू लागलायं. डिझेल समुद्रात पसरु नये यासाठी बार्जच्या चौभोवताल भूमर लावण्यात आलयं. मात्र पाण्याच्या लाटांमुळे ते भूमरला अडत नसून मोठ्याप्रमाणात पसरू लागलं आहे.
यावेळी महारष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पालघर जिल्हा अध्यक्ष तथा वडराई मच्छीमार संस्थेचे चेअरमन मानेंद्र आरेकर यांनी आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं की, 12 दिवसांपासून हे बार्ज इथं असून या बार्जवर 80 हजार लीटर डिझेल असून त्यातून ही गळती सुरु झाली आहे. त्यामुळे आजुबाजुचा जो समुद्र परिसर आहे, इथं जी मासेमारी केली जाते त्यावर त्याचा परिणाम होवू लागला असून मासळीला वास येवू लागला आहे. शासनाच्या गाइडलाईन्स प्रमाणे 31 मे ते 31 जुलै पर्यंत मासेमारी बंद असते. त्यावेळी इथले लोकं किनारपट्टीवर मासेमारीकरून आपली उपजीविका भागवत असतात. मात्र या गळतीमुळे मासळीला वास येत आहे. त्यामुळे सरकारनं हे 80 हजार लीटर डिझेल ताबोडतोब त्यातून काढून ते पसरन्याचा धोका आणि मच्छीमारांवर येणारा धोका थांबवावा. आम्ही सर्व खात्यांना याबाबत पत्र व्यवहार केला असून मात्र अजुन कोणही याकडे लक्ष दिलेलं नाहीये.