पालघर : पालघर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानं वसई पूर्वेकडील तानसा नदीनं धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.
दमदार बरसत असलेल्या पावसामुळे मेढे गावातला पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यानं भाताने ,नवसइ, थळ्याचापाडा, आडणई, जांभूळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भूकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा या 12 गावांचा संपर्क तुटला आहे. या 12 गावांत जाण्यासाठी हा पूल एकमेव असा मार्ग आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराची भीती गावकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान जिल्ह्यात आज 108.67 मिमी पावसाची नोंद झाली आहे.