पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. यावेळी अध्यक्ष पदी शिवसेनेच्या वैदही वाढाण तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे यांची निवड झाली आहे. अध्यक्ष पदासाठीची शिवसेनेच्या वैदही वाढाण आणि भाजपच्या सुरेखा थेतले यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सांबरे आणि महेंद्र भोणे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र सुरेखा थेतले आणि महेंद्र भोणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली.
जिल्हा परिषदेच्या भारती कामडी यांनी ७ जुलै २०२० ला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ९ जुलै २०२१ पासून समाजकल्याण सभापती विष्णू कडव हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते.
2020 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 57 जागांपैकी भाजपला 12, शिवसेनेला 18, राष्ट्रवादी कोंग्रेसला 15, बविया ला 4, सीपीआय ( एम ) ला 5, अपक्ष ला 2 आणि कोंग्रेस ला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आलं होतं. ज्यानंतर भाजपला सोडून इतर सर्व पक्षांनी एकत्र येउन सव्वा सव्वा वर्षासाठी अध्यक्ष पद शिवसेनेला तर उपाध्यक्ष पद एनसीपीला देण्यात आलं. ठरल्यानुसार आता सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भारती कामडी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात आलेल्या सर्वोच न्यायालयाच्या निर्णयानंतर उपाध्यक्ष निलेश सांबरे यांचं पद रदद् झालं होतं.