पालघर : गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात मुसळधार झाला होता. या पावसामुळे अनेक भागातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला आणि करावा लागत आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल असं कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातल्या सफाळया मधल्या नंदाडे इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी केली. त्यावेळी परिसरातल्या नागरिकांशी चर्चा करताना ते बोलत होते.
या अतिवृष्टीमुळे बऱ्याच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. यावर उपाययोजना करण्याचे निर्देश तसचं धोकादायक परिसरातल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याचं पालकमंत्री यांनी सांगितलं.