पालघर : पालघर जिल्ह्यातल्या चिंचणी समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिङले या प्रजातीच्या दोन कासवांना स्थानिक ग्रामस्थांनी जाळ्यातुन बाहेर काढून जीवनदान दिलं आहे. त्यांनतर डहाणू वनविभाग आणि वाईल्डलाईफ कंझर्व्हेशन ऍण्ड वेल्फेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून या दोन्ही कासवांना डहाणूच्यासमुद्री कासव उपचार व पुनर्वसन केंद्र इथं दाखल करण्यात आला आहे.
चिंचणी समुद्र किनाऱ्यावर ही दोन कासवं मासेमारी करणाऱ्या जाळ्यात अडकली होती. हे चिंचणी गावातल्या काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अगोदर या कासवांना जाळयातुन बाहेर काढलं. त्यांनतर याबाबत ची माहिती त्यांनी डहाणू वन विभाग आणि WILDLIFE CONSERVATION AND ANIMAL WELFARE ASSOCIATION ( WCAWA ) या संस्थेच्या स्वयंसेवकांना दिली.
त्यानंतर वनरक्षक विनायक अंधेर यांनी या कासवांना उपचारासाठी WCAWA या संस्थेच्या समुद्री कासव उपचार व पुनर्वसन केंद्रात दाखल केलं.