पालघर : पालघर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे काही लोकांना संगनमत करून वैक्सीन दिली जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर आता तालुका आरोग्य अधिकारी खंदारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. hत्यामुळे पालघर तालुका आरोग्य अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार आता मासवन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्कीय अधिकारी डॉ. तनवीर शेख यांच्याकड़े पुढील आदेश येई पर्यंत देण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे लसीकरणासाठी उपयोगात आणलेले ४८ इंजेक्शन आणि काही वैक्सीनच्या बाटल्या पालघर नगरपरिषदेच्या नगरसेवकांना सापडून आल्या होत्या. त्यानंतर नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयात एकचं गोंधळ घातला होता. आणि याबाबतची तक्रार नगरसेवकांनी जिल्हा परिषदेचे सीईओ सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता तालुका आरोग्य अधिकारी खंदारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.