पालघर : पालघर palgharठाण्याला आयएसओ मानांकन मिळालं आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणारं पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे हे महारष्ट्र राज्यातलं आयएसओ ( ISO ) मानांकन मिळवणारं पहिलं लोहमार्ग पोलीस ठाणे असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तलया अंतर्गत येणा-या पश्चिम परिमंडळातल्या वसई विभागातल्या पालघर रेल्वे पोलीस ठाण्याची स्थापना 1960 सालात झाली. वैतरणा खाडी ते गुजरात बॉर्डर मधल्या बोर्डी पर्यंत म्हणजे जवळपास 70 किलोमीटर पर्यंतचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. यातला बराचसा भाग हा दुर्गम असून मुंबईहून गुजरात सहित उत्तर भारताला जोडणाऱ्या सर्व रेल्वे या पालघर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जातात.
कोविड 19 च्या काळात विशेष ट्रेन मधून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना, परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती मदत, रेल्वे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आणि त्यांनी 1512 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केल्यास त्यांना तात्काळ हवी ती मदत या रेल्वे पोलीस ठाण्याकडून करण्यात आली.
गुन्हे तपासाचा विचार करता या रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या बऱ्याच गुन्ह्यांचा छडा लावण्यात आलाय. आणि त्यातल्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ मालकाला परत करण्यात आलाय. तसचं सर्व प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करून त्यातला मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं या रेल्वे पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आलं.
त्याचप्रमाणे रेल्वे अपघातातल्या मयत आणि जखमी व्यक्तीला तात्काळ मदत करणं, आणि त्यांच्या वारसांचा शोध घेणं, पोलीस ठाण्यातल्या कामकाजा संदर्भातल्या कागदपत्रांचं व्यवस्थित फायलिंग करणं, लेबलिंग करणं, कामकाजातलं सुसूत्रीकरण, प्रसन्न वातावरण ठेवण्याच्या उद्देशानं पोलीस ठाण्याच्या इमारतीची आणि परिसराची दुरुस्ती, रंगरंगोटी, सुशोभिकरण करणं असे सर्व कार्य केल्यानं हे पालघर रेल्वे पोलीस ठाणे आय.एस.ओ (ISO) प्रमाणपत्र मिळण्याच्या निकषात बसल्यानं या पोलीस ठाण्याला आय.एस.ओ मानांकन प्राप्त झालं आहे.