पालघर : संपूर्ण देशात 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत. याच आजादी का अमृत महोत्सवानिमित्त पालघर तालुका विधी सेवा समिती तर्फे जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
महाराष्र्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्याकडील पञानुसार पॅन इंडिया अवेअरनेस अॅण्ड आउस्टिच अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पालघर यांचेतर्फे सोमवारी पालघर जिल्ह्यातल्या कुंभवली एकलारे, मुरबे, नांदगांव तर्फे तारापूर, आलेवाडी— गुंदवली, नवापूर आणि पाम इथं विविध कायदेविषयक तसचं महिलांच्या न्याय हक्कांसाठी असलेले कायदे, तंटा वाद विवाद आपापसात मिटविणे आदी विषयांवर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांना अॅड. प्रिती काटकर, अॅड. तेजल ठाकूर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केलं.
या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला अॅड. मंदार पाटील, अॅड. धनजंय लोखंडे, अॅड. निकीता घरत, पॅरालिगल विद्यार्थी वितेश पाटील, मयंक गांधी यांसह त्या त्या गावातले ग्रामस्थ उपस्थित होते.