पालघर : पालघर परिसरातल्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी असणा-या गीता गिरिजाशंकर तिवारी यांचं दु:खद निधन झालं. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अॅड. जी. डी. तिवारी यांच्या त्या पत्नी होत्या. अॅड.जी.डी.तिवारी यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक योगदानात त्यांचा मोलाचा वाटा होता. ‘माझ्या सामाजिक राजकीय कार्यामागे त्या भक्कमपणे उभ्या असायच्या.’ अशी भावना अॅड. जी. डी. तिवारी यांनी व्यक्त केली.
कुटुंबवत्सल, दयाळू तसेच नात्यांमध्ये जिव्हाळा जपणाऱ्या अशी त्यांची ख्याती होती. पालघर परिसरातील पर्यावरणाशी त्या समरस झाल्या होत्या. जीवन जगताना नेहमी नीटनेटके आणि सुंदरतेने जगावे असा त्यांचा जीवनाबद्दल दृष्टिकोन होता. त्यांच्या जाण्याने मोहा, शेफाली, पिंकी आणि प्रिती या चार मुलींवर आणि सगळ्या तिवारी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.