पालघर : एकविरा देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या इको कारचा मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. रविवारी संध्याकाळी पाच ते साडे पाच वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे कुटुंब एकविरा देवीचं दर्शन घेवून घरी परतत असताना मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाव मनोर जवळपास सती माता हॉटेल समोर भरधाव वेगात असलेल्या इको कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं कार पुढे असलेल्या ट्रेलर ला धडकली. आणि त्यामुळे गुजरात मार्गीकेवर हा भीषण अपघात झाला. या इको कार मधले सर्व जण हे बोईसरच्या दांडी इथले रहवासी आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा ही समावेश आहे.