पालघर : जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ झालेल्या १२ मुलांच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांची मुदतठेव ही वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पालघर आणि बालक यांच्या संयुक्त खात्यावर राज्य शासनामार्फेत ठेवण्यात आली आहे. आणि मृत प्रमाणपत्राचं वाटप पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते नुकतचं करण्यात आलं.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना राज्यशासनाकडून ५ लाख आणि केंद्रशासनाकडून १० लाख असे १५ लाख रुपयांची रक्कम या अनाथ मुलांच्या संयुक्त खात्यात जमा होणार आहे. तसचं एक पालक गमावलेल्या मुलांना ( Department of Women and Child Development ) माहिला व बाल विकास विभागाच्या बाल संगोपन योजनेचा लाभ म्हणून दर महिन्याला ११०० रूपये वयाची १८ वर्ष पुर्ण होईपर्यंत बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार दिले जात असल्याची माहिती पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.