पालघर : पालघर मधल्या वाघोबा घाटात आज सकाळी जवळपास साडे आठ वाजताच्या दरम्यान एक विटांनी भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मजूर जखमी झाले असून पाच मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांवर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि उर्वरित तीन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे.
विटांनी भरलेला हा ट्रक मनोरहुन पालघरकडे येत असताना घाट उतरताना ट्रकचे ब्रेक फेल झाले. ज्यामुळे चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. आणि हा ट्रक उलटला. या अपघातात ट्रक मधील विटांवर बसलेले पाच मजूर गंभीर जखमी झाले. आणि दोन जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे.