पालघर : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी संचालित सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात १५ एप्रिलपासू न फळे आणि भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहे. परिसरात उत्पादीत आंबा, जांभूळ, करवंद, आवळा, पेरु, चिकू फळांपासून सरबते, जॅम, जेली, लोणचे, फ्रुटबार, कॅंडी यांसारखे रुचकर, टिकाऊ, पौष्टीक प्रक्रिया पदार्थ तसचं भाज्यांची लोणची यांची उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग, जमाखर्च या संबंधीचे पायाभूत प्रशिक्षण भरपूर प्रात्यक्षिकांसह मिळाल्यानं किफायतशीर प्रक्रिया उद्योग उभारणीची मानसिकता तयार होण्यास या प्रशिक्षणामुळे निश्चितच हातभार लागेल.
आरोग्यदायी, मूल्यवर्धित पदार्थ घरच्या घरी तयार करता येतील. सुगीच्या काळात वाया जाणाऱ्या फळांच्या आणि भाज्यांच्या काढणीनंतर योग्य व्यवस्थापन तंत्र आत्मसात करता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी, हौशी गृहिणी, नवउद्योजक, प्रगतिशील शेतकरी यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले आहे. महाविद्यालयातील हॉर्टीकल्चर विभागाच्या प्रा.आनंद जाधव( ९४२०५७००४ ७ ), प्रा.प्रवीणा कोचरेकर ( ९२२६२७९८०४ ) यांच्याशी १५ एप्रिल पूर्वी संपर्क साधून
इच्छूक व्यक्तींनी आपला प्रवेश निश्चित करावा असे जाहीर आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.