पालघर : पश्चिम रेल्वेच्या वाणगाव – डहाणू रोड स्थानका दरम्यान अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वेसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी अप मार्गावर सकाळी ८:१५ ते ९:१५ वाजेपर्यंत १ तासाचा मेगाब्लाँक आणि डाऊन मार्गावर सकाळी ६:३० ते दुपारी १:३० पर्यंत ८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान बांद्रा जम्मूतावी स्वराज एक्सप्रेसला वाणगाव आणि डहाणू रोड स्थानकात थांबा दिला जाईल. बांद्रा अमृतसर पश्चिम एक्सप्रेसला वाणगाव स्थानकात थांबा दिला जाईल.
बांद्रा – सुरत सुपरफास्ट इंटरसिटी, सौराष्ट्र एक्सप्रेस, सकाळी ११.३० ची विरार – वलसाड शटल, बांद्रा – वापी पॅसेंजर, चर्चगेट – डहाणू लोकल, डहाणू रोड – बोरिवली मेमू, वापी – विरार शटल, डहाणू रोड – दादर लोकल, डहाणू रोड – विरार लोकल रदद् करण्यात आल्या आहेत.
वांद्रे -गोरखपूर एक्सप्रेस वापी पर्यंतच राहील. मुंबई सेंट्रल – अहमदाबाद गुजरात एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल ते उंबरगाव स्थानका दरम्यान रदद् करण्यात आली आहे. ती उंबरगाव स्थानकातून सुटेल. सूर्यनगरी एक्सप्रेस बांद्रा ते सूरत स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती सूरत स्थानकातून सुटेल. कर्णावती एक्सप्रेस मुंबई सेंट्रल ते वापी स्थानका दरम्यान रद्द करण्यात आली असून ती वापी स्थानकातून सुटेल. बोरिवली वलसाड मेमू ही बोरिवली ते डहाणू रोड दरम्यान रद्द करण्यात आली असून ती ती डहाणू रोड स्थानकाहून सुटेल. बोईसर मेमू ही पालघर ते बोईसर स्थानकादरम्यान रद्द असून ती पालघरला टर्मिनेट होईल. विरार – डहाणू, चर्चगेट – डहाणू, अंधेरी – डहाणू या अप – डाउन मार्गाच्या लोकल वाणगाव आणि बोईसर स्थानकापर्यंत थांबणार आहेत. आणि त्या तिथूनचं सुटणार आहेत.