पालघर : पालघर जिल्ह्यातले शेतकरी हे नेहमीच आपल्या शेतात काही न काही नवंनवीन असे प्रयोग करताना दिसून येतात. यावेळी असाच काहीसा प्रायोगिक तत्वावर टरबूजच्या शेतीचा नवीन प्रयोग केला आहे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधल्या गातेस खुर्द या गावात राहणा-या प्रयोगशील महिला शेतकरी कल्पिता कुमार पष्टे यांनी. तसा तर वाडा तालुका हां कोलम जातीच्या तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या शेतकरी महिलेनं पारंपरिक शेतीला बगल देत आता आपल्या शेतीत सुंदर आणि गोड अशा टरबूज ची लागवड केली आहे.
या आहेत गातेस खुर्द या गावात राहणा-या प्रयोगशील महिला शेतकरी कल्पिता पष्टे. ज्या या गावच्या पोलीस पाटील देखील आहेत. कल्पिता या आपल्या शेतीत आतापर्यंत पावसाळयात भातशेती, उन्हाळयात कलिंगडची करत होत्या. हे करत असताना आपल्या शेतजमीनीत टरबूज फळाची देखील लागवड होवू शकते का हे पाहण्यासाठी पहिल्यांदा कलिंगडा बरोबर टरबूज या फळाची लागवड केली. आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी देखील झाला आहे.
पहा व्हिडिओ …..
अशी केली लागवड :
आदर्श महिला शेतकरी म्हणून गौरव करण्यात आलेल्या कल्पिता कल्पिता पष्टे आणि कुमार पष्टे या दामपत्यांनी मिळून आधुनिक तंत्रज्ञानाचा सहाय्यानं आपल्या शेतात 25 गुंठयाच्या जागेत कुमार सिड्स जातीच्या जवळपास तीन हजार टरबूजांच्या झाडांची लागवड केली आहे. तसचं अडीच एकर जागेत कलिंगडाची लागवड केली आहे. उन्ह्याळयातलं हे तीन महिन्यांचं पिक असून या टरबूजची लागवड त्यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती. टरबूजची लागवड करताना सुरुवातीला वळवे ओढून त्यात ड्रिप टाकुन त्यावर मल्चिंग पेपर टाकण्यात आले. आणि मग टरबूजचं कुमार सिड्स या बियाणाची लागवड करण्यात आली. यासाठी 1 ट्रक्टर ट्रोली शेणखत, 75 किलो डीएपी खत, 50 किलो 18-18-18 खत, आणि 75 किलो 10-26-26 आदी खतं वापरण्यात आली. यात भेसळ डोस 30 किलो, 19-19 खत 15 किलो आणि 12-61 खत 15 किलो या मात्रेत खतं देण्यात आली.
शेतीत एक नवा प्रयोग म्हणून कल्पिता यांनी टरबूज या फळ पिकाची लागवड केली. या शेतीसाठी त्यांना 40 हजारांचा खर्च आला. आणि सध्या टरबूजांना माला नुसार 18 ते 20 किलो इतका भाव मिळत आहे. जिल्ह्यातून आणि आसपासच्या भागातून टरबुजांना मोठी मागणी आहे. सर्व खर्च वगळता या शेतीतुन दिड लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळत असल्याचं कल्पिता पष्टे यांनी सांगितलं. फळ माल जसा जसा तयार होईल. तस तसं ही टप्प्या टप्प्यानं ही शेती होते. त्यामुळे यंदा मार्केट आणि आमच्या शेतीचा समतोल हा बरोबर असल्यानं आम्हाला या शेतीतुन चांगला नफा मिळत असल्याचं कल्पिता यावेळी म्हणाल्या.
पोलीस पाटिल आणि शेतकरी अशी दुहेरी भूमिका बजावत भर रखरखत्या उन्हात या शेतीसाठी केलेल्या परिश्रमाचे फळ नफ्याच्या स्वरूपात आज महिला शेतकरी कल्पिता आणि त्यांचे पति कुमार यांना मिळत आहे. त्यांची ही भूमिका इतर महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल.