मुंबई : सुनिर्मल फाऊंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिक, पत्रकार, सामाजिक, शिक्षक यांना सुनिर्मल गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये . मिलिंद रूपचंद पाटील यांना सुनिर्मल फाउंडेशनचा शिक्षणभूषण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. धारावी येथील श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल मध्ये २२ मे रोजी या पुरस्कार सोहळयाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मिलिंद पाटील हे त्यांच कार्य व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनाविरोधात प्रचार, प्रसार, प्रबोधन, व्यक्तीचे मतपरिवर्तन करून त्यांना निर्व्यसनी बनविण्यासाठी युवकांपुढे, समाजापुढे व्यसनमुक्तीचा संदेश जावा यासाठी पथनाट्य स्पर्धा, रॅली अशा प्रकारे विविध कार्यक्रमांतून संदेश देत करीत असतात. त्यांच्याकडून पालघर जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान सुध्दा राबविण्यात येत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना सुनिर्मल फाउंडेशकडून मुंबई चे पहिले नगरपाल जगन्नाथराव हेगडे, दैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय सुनिर्मल फाउंडेशनचा शिक्षणभूषण गौरव पुरस्कार 2021 देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासाठी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी, पालक मित्रपरिवार सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाला सुनिर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे आयोजन दत्ता खंदारे व सुनिर्मल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.