पालघर : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (उच्च माध्यमिक) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यात पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.७७ टक्के इतका लागला आहे. यंदा ही या परीक्षेत मुलीनी बाजी मारली असून ९२.९२ टक्के मुली पास झाल्या आहेत.
या परीक्षेला पालघर जिल्ह्यातले २६८२२ मुले आणि २१२७२ मुली असे एकूण ४८०९४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २४३७३ मुले आणि १९७६७ मुली उत्तीर्ण झाल्या. असे एकूण ४४१४० विद्यार्थी जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले आहे. यंदा ९२.९२ टक्के मुली आणि ९०.८६ मुले पास झाली आहेत.
सर्व विद्यार्थ्यांचे पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी अभिनंदन केलं आहे.