पालघर : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (उच्च माध्यमिक) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. या बारावीच्या परीक्षेत पालघर मधल्या सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल हा ९३ टक्के इतका लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल ९१ टक्के लागला आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही शाखांचा एकत्रित निकाल हा ८६ टक्के इतका लागला आहे. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण १७०० विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यामध्ये एम.सी.वी.सी. या शाखेचा निकालही ८६ टक्के इतका लागला आहे.
यावेळी सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतुन सौध्न्या मनिष पिंपळे या विद्यार्थीनीने ८८ टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर साक्षी ओंकार कोटीवार या विद्यार्थीनीने ८६.१७ टक्के मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. वाणिज्य शाखेतुन जीत घनश्याम पामाले या विद्यार्थ्याने ९३.१७ टक्के मिळवून प्रथम क्रमांक तर धृव कृष्णकांत म्हात्रे या विद्यार्थ्याने ९२ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसचं विज्ञान शाखेतुन जीत स्वप्निल म्हात्रे या विद्यार्थ्याने ८५.६७ मिळवून प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक रुद्राक्षी प्रफुल्ल ठाकूर ८३.६७ टक्के, अथर्व संतोष पिंपळे ८३.६७ टक्के, प्रियांशु राजेश चतुर्वेदी ८३.६७ टक्के या विद्यार्थ्यानी पटकावला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी अभिनंदन केले आहे. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.