आपल्या सभोवतालच्या जगात काही जण जन्मजात भारदस्त पावलांनी चालतात. तसेच भारदस्त जीवन जगतात. असच आनंदी, स्वच्छंदी, निरागस आणि अजात षत्रू व्यक्तिमत्व म्हणजे वृत्तनिवेदक सूत्रसंचालक प्रदिप भिडे. 02 आॅक्टोबर 1972 ला मुंबई दूरदर्षनच्या कार्यक्रमाची सुरूवात वरळीच्या स्टुडिओतून झाली. काही दिवसांतच दूरदर्षन राश्ट्रीय कार्यक्रमातल्या इंग्रजी, हिंदी बातम्यांचे प्रसारण इथूनच सुरू झाले. अल्पावधीत मराठी बातम्या सुरू झाल्या. मराठी वृत्तविभाग कार्यान्वित झाला. अफाट वाचन, अमोघ वकृत्व, स्पश्ट षब्दोच्चार आणि निवेदकाला आवष्यक असणारा गद्यातल्या आवाजाचा भारदस्तपणा ही प्रदिपच्या व्यक्तिमत्वाची वैषिश्टये होती.
मुंबई दूरदर्षन केंद्रात आपल्या उमेदीच्या दिवसांत सुरूवातीला त्याने निर्मिती सहाय्यक म्हणून त्यावेळचे जेश्ठ निर्माते आकाषानंद मनोहर पिंगळे, सुहासिनी मुळगांवकर यांच्यासोबत काम केलं. अनेक कार्यक्रमांच्या निर्मितीत त्याचा सहभाग होता. पुढे अल्पावधीत मुंबई दूरदर्षनच्या, मराठी बातमी पत्रात नमस्कार ! दूरदर्षनच्या मराठी बातम्यात मी प्रदिप भिडे आपले स्वागत करीत आहे. या भारदस्त वृत्तनिवेदनाने मराठी रसिक पे्रक्षकांना अवघ्या महाराश्ट्राला आपुलकीचं वेड लावलं. समोरच्या व्यक्तीचं दिलखुलासपणे कौतुक, करणे, हा प्रदिपचा स्थायीभाव होता. बातम्या देण्याच्या त्याच्या स्वतंत्र आणि वेगळया षैलीने तो वृत्तनिवेदक लोकप्रियतेच्या षिखरावर पोहोचला. या लोकप्रियतेमुळेच असंख्य लघुपटांचे निवेदन, अगणित जाहिरातींमधला त्याचा आवडणारा हवाहवासा वाटणारा आवाज, सार्वजनिक ठिकाणी होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन, मा. राश्ट्रपती महोदय, मा. पंतप्रधान महोदय, मा. राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीतील अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक, कार्यक्रमातील प्रदिपचे सूत्रसंचालन म्हणजे रसिकश्रोत्यांना श्रवणाची आनंदपर्वणी होती. राज्य विधी मंडळातील अर्थसंकल्पिय अधिवेषनातील पहिल्या दिवषी मा. राज्यपालांच्या अभिभाशणाचा मराठी अनुवाद हा प्रदिपच्या आवाजातच विधी मंडळ सदस्यांनी वर्शानुवर्शे ऐकला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं षिवाजी पार्कवरील मुख्य ध्वजारोहण संचलन तसेच 1 मे, महाराश्ट्र दिनाचा राज्यातला मुख्य कार्यक्रम याचं समालोचन सूत्रसंचालन त्याने कित्येक वर्श केलं. ते मी प्रत्यक्ष अनुभवलयं.
कालांतराने आयुश्याच्या स्थितंतरात वृत्तनिवेदनाचं काम चालू ठेवून त्यानं खाजगी क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं. पुढे स्वतःचा डबिंग स्टुडीओ व्यवसाय सुरू केला. वृत्तनिवेदक म्हणून तो कार्यरत असतांना मुंबई दूरदर्षनच्या वृत्तविभागात 1991 ते 1993 या दोन वर्शांच्या कालावधीत वृत्तनिर्माता म्हणून कार्यरत असतांना मला प्रदिपला वृत्तनिवेदक म्हणून जवळून पाहता आले. निर्मात्याची प्रत्येक सूचना वृत्तनिवेदकाने तंतोतंत पाळावी ही त्याची षिस्त होती. थेट प्रसारित होणाÚया (स्पअम) बातम्यांपूर्वी लिखित बातमी आणि संदर्भ दृष्य यांची तालिम घ्यायला त्याने कधीच आढेवेढे घेतले नाही. पुढे महाचर्चा कार्यक्रमात तो सूत्रसंचालक म्हणून सहभागी झाला. जवळजवळ 10 वर्शे त्याने महाचर्चेमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केलं. विविध विशयांवरच्या या प्रासंगिक थेट प्रसारित होणाÚया चर्चा कार्यक्रमात प्रदिपने स्वयंषिस्तीचे कधी उल्लंघन केले नाही. सहभागी होणाÚया मान्यवरांना प्रष्न विचारतांना आपण त्यांना आरोपीच्या पिंजÚयामध्ये उभे केलेले नाही, या प्रसारण माध्यमातल्या सभ्यता संकेतानं त्याने प्रत्येक कार्यक्रम यषस्वी केला.
राज्यातल्या, देषातल्या, विदेषातल्या अनेक मराठी दिग्गजांच्या त्यानं घेतलेल्या मुलाखती हा दूरचित्रवाणी क्षेत्रातला सांस्कृतिक ठेवा आहे. त्याची झलक ‘कोर्ट मार्षल’ या मुलाखत कार्यक्रमात मला जवळून पाहता आली. सन 2002 साली ‘कोर्ट मार्षल’ या मुंबई दूरदर्षनच्या मुलाखत कार्यक्रमाची निर्मिती जबाबदारी माझ्यावर आली. पुढे मराठी विष्वातल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्याने सहज सुंदरपणे घेतल्या. त्या आजही मुंबई दूरदर्षनच्या संग्रही आहेत. तो समोर आल्यावर मित्रा कसा आहेस, असा आपल्या भारदस्त आवाजात घरच्या आपुलकीने बोलायचा. तेव्हा अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहायचे. पहिल्या भेटीत कुणालाही आवडाव अस त्याचे व्यक्तिमत्व होते. मुंबई दूरदर्षन केंद्रातल्या प्रत्येकाचे प्रदिपवर निरतिशय प्रेम होतं. त्याचं वागण, बोलण सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारं होतं. वयाच्या पन्नाषीनंतरही लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊनही त्याच्या डोक्यात कधी अहंकारी विचारांचे वादळ घोंघावल नाही. आचार-विचाराने त्याचे पाय मातीत रूतलेले होते. काळाच्या ओघात महाराश्ट्राच्या घराघरात, मराठी माणसाच्या मनामनात हृदयसिंहासनावर विराजमान झालेला प्रदिप एका दुर्धर आजाराने अंथरूणावर खिळला, याची चाहूल लागण्याचा एक प्रसंग मला आठवतो. महाचर्चाचे थेट प्रसारण सुरू झालं. प्रदिप सूत्रसंचालक होता. अध्र्या तासानंतर सूत्रसंचालन करतांना तो थांबला. काही सेकंद त्याला बोलणचं सुचेना. त्याने स्वतःला सावरलं आणि तो महाचर्चा त्याने सावरून नेला. काही दिवसांनी त्याच्या सुरू झालेल्या आजारपणाची बातमी कळली. आमचं फोनवर बोलणं झालं. सद्या कार्यक्रमात येणार नाही, लवकरच बरा होईन आणि महाचर्चा करू असं तो म्हणाला. पुढे मुंबई दूरदर्षनच्या 02 आॅक्टोबर ‘वर्धापन’ दिनाचा एक विषेश कार्यक्रम महाचर्चेत प्रसारित झाला. त्यात कार्यक्रम विभागातल्या सगळया जुन्या जाणत्या ज्येश्ठ निर्मात्यांबरोबर प्रदिपलाही बोलावलं. प्रदिपच्या सोबत त्याची पत्नी सुजाता वहिनी होती. एरवी हत्तीच्या पावलाने चालणारा हा भारदस्त माणूस मेकअप रूममधून स्टुडीओमध्ये जाताना सुजाताच्या आधाराने हात धरून गेला. तेव्हा मी अस्वस्थ झालो होतो. पुढे त्याचा आजार बळावला. त्या अवस्थेत त्याला पाहणं कठिण होतं. एकदा मनाचा धीटपणा करून अंधेरीत त्याच्या घरी त्याला भेटलो. ती आमची षेवटची भेट. पुढे 4-5 वर्शे आजाराला झुंज देणारा प्रदिपचा जीवनप्रवास आज 65 व्या वर्शी थांबला.
वर्षभरापूर्वी अतिरेकी सोशल मिडीयाच्या घाईगर्दीत चुकीच्या बातम्या देण्याच्या अफवावृत्तीने त्याचा न झालेला मृत्यूही घडवून आणला. त्यावेळी आमच्या या मित्राचं आयुश्य वाढावं, असं सर्वांनाच वाटलं. आज प्रदिप गेल्याची बातमी कळली. अर्थात ती अफवा नव्हती. भारदस्त आवाजाचा, हस-या चेह-याचा, जिंदादिल स्वभावाचा सर्वांना हवाहवासा वाटणारा प्रदिप हे जग सोडून गेला, ही बातमी खरी होती. प्रभावषाली वृत्तनिवेदक, प्रतिभासंपन्न सूत्रसंचालक आणि अश्टावधानी मुलाखतकार या वैभवी परंपरेतल्या एका प्रदिप युगाचा अस्त झाला. त्याला भावपूर्ण आदरांजली.
जयु भाटकर
माजी सहाय्यक संचालक,
मुंबई दूरदर्शन.