पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर -तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या प्लॉट नंबर N41 राजकोब या कंपनीत आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीतला लाखोंचा माल जळून खाक झाला. मात्र या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याच कारण अद्याप कळू शकलेलं नाही.