पालघर : जागतिक युवा कौशल्य दिनाचं औचित्य साधून पालघर जिल्ह्यात आयटीआय मध्ये फॅशन टेक्नोलॉजी, ड्रेस मेकिंग, सुईंग टेक्नोलॉजी या सारख्या विषयांत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या कला – कौशल्यांना चालना देण्यासाठी पालघरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे ( आय.टी.आय ) कडून पालघर जिल्हा मुख्यालयात आज जिल्हा स्तरीय फॅशन शो चं आयोजन करण्यात आलं होतं.
या जिल्हा स्तरीय फॅशन शो मध्ये पालघर जिल्ह्यातल्या एकुण 9 आयटीआय मधल्या जवळपास 28 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. आझादी का अमृत महोत्सव – कलर्स आणि सिंबोल ऑफ़ पीस या तीन थीम वर आधारित हा फॅशन शो घेण्यात आला. या फॅशन शो मधून 9 स्पर्धक
पहा व्हिडिओ ……..
निवडण्यात आलेत. जे 30 जूनला प्रादेशिक स्तरावर होणा-या फॅशन शो मध्ये पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. आणि या मध्ये निवड झालेले विद्यार्थी हे 15 जूलैला जागतिक युवा कौशल्य दिनी होणा-या राज्यस्तरीय फॅशन शो मध्ये सहभागी होवू शकतील.
पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात आयटीआय मध्ये फॅशन टेक्नोलॉजी, ड्रेस मेकिंग, सुईंग टेक्नोलॉजी या सारख्या विषयांत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या कला – कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांनी वर्षभरात घेतलेल्या स्किल्स मधून त्यांना जे प्रेझेंटेशन ( सादरीकरण ) करायचं आहे ते करता यावं यासाठी या जिल्हा स्तरीय फॅशन शो चं आयोजन करण्यात आलं होतं.