पालघर : महाराष्ट्र राज्याच्या 18 वर्षे आणि 20 वर्षाखालील मुले-मुलींच्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत पालघर जिल्ह्याला यंदा घवघवीत यश मिळालं आहे. यंदा जिल्ह्याला 3 सुवर्ण पदकं, 5 रौप्य पदकं आणि एक कांस्य पदक मिळवण्यात यश आलं आहे. 20 वर्षाखालील मुलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत शिवांक मिश्रा यानं 11.13 से ही वेळ नोंदवत सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे. तर 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 20 वर्षा खालील मुलांच्या 4 x 100 मीटर रीले स्पर्धेत पालघर जिल्ह्याला रौप्य पदक मिळाले असून सुमित मोंडल याला 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळालं आहे.
18 वर्षा खालील मुलींच्या स्पर्धेत इशा जाधव हिनं 200 मीटर आणि 400 मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे. तर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. शंकर जाधव याला तिहेरी उडीत रौप्य पदक मिळालं असून श्रावणी शेटे हिला 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.
या स्पर्धेसाठी जिल्ह्याचे सचिव राकेश सावे यांनी टेक्निकल डेलिगेट म्हणून काम पाहिलं तसचं राष्ट्रीय पंच बाबासाहेब गुंजाळ यांनी गोळा थाळी भाला फेक स्पर्धासाठी मुख्य पंच म्हणून काम पाहिलं. उदय सावे आणि उदेक यांनी या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिलं.