पालघर : केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहत आहेत की नाही, त्या त्या योजनांचा लाभ लोकांना मिळतोय की नाही, तसचं केंद्र शासनाच्या योजना या जर काही लोकांपर्यंत पोहचत नसतील तर त्या मागची कारणं काय आहेत, त्यात येणारे अरथडे काय आहेत हे जाणून घेण्यासाठीचं आमचा हा दौरा असल्याचं केंद्रीय जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री बिशेश्वर टूडू म्हणाले. पालघर जिल्ह्यातल्या विरारच्या जीवदानी माता मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रीय जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री बिशेश्वर टूडू हे पालघरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले असून आज त्यांनी वसई – विरार भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी लोकसभा प्रवास योजना कार्यक्रमाअंतर्गत वसई – विरार भागातल्या केंद्रशानाच्या विविध योजनांचा आढावा घेतला आणि बऱ्याच लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. लाभार्थ्यांच्या विविध समस्या, त्यांच्या सूचना यावेळी केंद्रीय मंत्री बिशेश्वर तूडू यांनी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी विरारच्या जीवदानी माता मंदिरात पत्रकारांशी संवाद ही साधला.
या भागात पिण्याचं पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा यासारखे तीन-चार विषय हे अतिशय आवश्यक आहेत. या विषयी जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी तसचं दौऱ्यानंतर वरिष्ठ स्तरावर ही आपण चर्चा करणार असल्याचं यावेळी केंद्रीय मंत्री बिशेश्वर टूडू यांनी सांगितलं.